राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम

On: April 26, 2024 8:05 AM
Lok Sabha Election 2024 Phase 2
---Advertisement---

Lok Sabha Election 2024 | राज्यात अमरावती, बारामती, नाशिक यासह अजून काही मतदार संघ आहेत जिथे युतीमधीलच घटक पक्षांमध्ये जोरदार तिढा निर्माण झाला आहे. त्यात अमरावतीची जागा तर विशेष चर्चेत आहे. येथे भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राणांचा विरोध करत आमदार बच्चू कडू यांनी भाजपविरोधातच अमरावतीत उमेदवार उभा केलाय. त्यांनी दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलंय.

दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू सभेच्या जागेवरून चांगलेच संतापले होते. त्यांनी नवनीत राणा यांच्यासह भाजपवर जोरदार प्रहार केला होता. बच्चू कडू यांनी आज 26 तारखेला अमरावतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते, असा दावाही केला होता. आज याच मतदारसंघात मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे अमरावतीकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे.

आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल.

आज देशातील 88 मतदारसंघात मतदान

यासोबतच देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघातदेखील आज मतदान होईल. राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा निवडणुकीच्या मैदानात आहेत. याशिवाय मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

आज दुसऱ्या (Lok Sabha Election 2024) टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट या जागांवर मतदान होईल.

महाराष्ट्रात ‘या’ भागात मतदान होणार

बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)
अकोला : अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)
अमरावती : नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) विरुद्ध आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)
वर्धा : रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
यवतमाळ : वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा)
हिंगोली : बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)
नांदेड : प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
परभणी : महादेव जानकर (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय जाधव (उबाठा)

News Title : Lok Sabha Election 2024 Phase 2

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट फायदा होईल!

अंबादास दानवेंचा मास्टरस्ट्रोक, थेट एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट

‘जावई 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे’; पुण्यातील तरूणाने पालकांना दाखवला आरसा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतूक नियम बसवले धाब्यावर, उलट्या दिशेनं हाकली वाहनं!

Join WhatsApp Group

Join Now