Lok Sabha Election 2024 | लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वीच्या प्रचारतोफा आज (24 एप्रिल) थांबणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान होणार आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. निवडणूक लढवणारे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्जासोबत संपत्ती आणि गुन्हे दाखल असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करत आहेत. त्यातून उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे समोर येत आहेत. अशात देशातील सर्वांत श्रीमंत उमेदवाराचं नाव समोर आलं आहे.
या उमेदवाराच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्हालाही धक्काच बसेल. या उमेदवाराने तब्बल 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ते व्यवसायाने डॉक्टर असून पेम्मासानी चंद्रशेखर असं त्यांचं नाव आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदार संघातून तेलुगू देसम पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.
एकूण संपत्ती किती?
डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर हे एनआरआय उमेदवार आहेत. त्यांची बहुतांश संपत्ती ही अमेरिकेत आहे. त्यांचं 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातील उत्पन्न 3 लाख 68 हजार 840 रुपये इतके होतं. तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे 1 लाख 47 हजार 680 रुपये इतके उत्पन्न होते.
त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर चंद्रशेखर यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.पेम्मासानी चंद्रशेखर यांची स्थावर मालमत्ता 72 कोटी 24 हजार 245 रुपये असून त्यांच्या पत्नी श्रीरत्न यांची 34 कोटी 82 लाख 22 हजार 507 रुपये संपत्ती आहे. तसंच त्यांच्यावर 519 कोटींचं कर्जदेखील आहे.
त्यांच्याकडे 101 कंपन्यांचे शेअर्स आहेत. कोटींची संपत्ती असलेल्या चंद्रशेखर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ते मूळचे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेम येथील रहिवाशी आहेत. गुंटूर लोकसभेसाठीच ते उभे राहिले असून येथे 13 मे (Lok Sabha Election 2024) रोजी मतदान होणार आहे.
News Title : Lok Sabha Election 2024 NRI Doctor Pemmasani Chandrasekhar is Richest Candidate
महत्त्वाच्या बातम्या-
मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले
भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट
पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब
‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…
शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती






