Lok Sabha Election 2024 | कालच 9 एप्रिल रोजी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा जाहीर केल्या. पण, मविआतील तिन्ही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. अशातच आज (10 एप्रिल) शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. सातारा आणि रावेरचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पण माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ट्वीटमध्ये म्हटलं की, “तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, खा. शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!”
दरम्यान, शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून अगोदरच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सातारा आणि रावेर या उमेदवारांची घोषणा झाली आहे.
सातारा आणि रावेरचा उमेदवार ठरला
सातारामध्ये श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली जाणार होती. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने पवारांची चिंता वाढली होती. आता साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपकडून (Lok Sabha Election 2024 ) साताऱ्यात अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही, पण उदयनराजे यांचं नाव येथे चर्चेत आहे.
तर, रावेर येथे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. त्यांनीही नकार दिल्याने या ठिकाणी आता शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना तिकीट दिलं आहे. रावेरमधून भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होईल.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
माढ्याचा तिढा अजूनही कायम
दरम्यान, माढ्यातून भाजपने (Lok Sabha Election 2024 ) विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांना मिळाली आहे. पवारांकडून सध्या या जागेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून आघाडीवर आहे. मोहिते पाटील हे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकारणात आहे.
News Title- Lok Sabha Election 2024 NCP Sharad Pawar Candidates Third List
महत्त्वाच्या बातम्या-
आता घर घेण्याचं स्वप्न होईल साकार; होम लोनवर ‘या’ बँका देतायेत सर्वांत कमी व्याजदर
अशा स्वभावाच्या व्यक्तींकडे पैसे टीकत नाहीत, आचार्य चाणक्यांनी सांगितलं कारण
ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?
नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर






