अक्षरश: त्यावेळी मी मृत्यूसाठी प्रार्थना करत होतो, हनी सिंहचा अत्यंत धक्कादायक खुलासा

On: January 2, 2023 5:23 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडचा(Bollywood) रॅपर म्हणून ओळखला जाणारा गायक हनी सिंह(Honey Singh) नेहमीच आपल्या गाण्यांमुळं किंवा वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत येत असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे नऊ मिलीयनपेक्षा जास्त फालोअर्स आहेत.

नुकतात हनी सिंहनं त्याच्या मॅरेजलाईफबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी हनी सिॆहचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोट घेतल्यानंतरची त्याची अवस्था काय झाली होती, याबात त्यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

मुलाखतीदरम्यान तो म्हणाला आहे की, मी अनेक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होतो. पत्नीसोबत नाते बिघडल्यानं मी खूप दुखावलो गेलो होतो. तसेच या वाईट काळात काही लोकांनी साथ दिली असंही तो म्हणाला आहे.

या मुलाखतीत त्यानं या काळात त्याची मानसिक स्थिती कशी होती हेही सांगितलं आहे. तो म्हणाला की, तो रोज मरण यावे यासाठी प्रार्थना करत होतो. मधूनच इतके मूड स्विंग व्हायचे की मलाही ते कळत नव्हते.

मी दारू प्यायचो तसेच धूम्रपान करायचो. हा मानसिक आजार कळायला मला तिन वर्षे लागली तर या आजारा विरूद्ध लढायला चार वर्षे लागली असंही हनी सिंह म्हणाला आहे.

दरम्यान, हनी सिंहनं मानसिक आजारातून बरे होण्यासाठी कुटुंबियांशी, मित्रांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दारू न पिण्याचे अवाहनही त्यानं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now