ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

On: October 11, 2023 1:16 PM
---Advertisement---

नाशिक | ड्रग माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुणे ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर त्याचे नाशिक कनेक्शन उघड झालं आहे. यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

नाशिकमध्ये ललित पाटील (Lalil Patil) याच्या भाऊ भूषण पाटील याने ड्रग्सच्या कारखाना उभा केला होता. त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी नुकताच छापा मारला. परंतु नाशिकमधील (Nashik) हा प्रकार नाशिक पोलिसांना माहीत नव्हता, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ड्रग्स तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील (Lalit Patil) आणि भूषण पाटील याच्या मागावर होते. साकीनाका पोलिसांनी 300 कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. त्या प्रकरणात हे आरोपी होते.

ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते. आता उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून भूषण पाटील याला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now