आता सिद्धार्थ-कियाराचंही ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न

On: February 1, 2023 10:17 AM
---Advertisement---

मुंबई | नुकतंच बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलचं(KL Rahul) लग्न थाटामाटात पार पडलं. आता या जोडीच्या पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय कपल लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघं ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले होते. चित्रपट सुपरहिट ठरला, या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली, परंतु रिअल लाईमध्येही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले.

आता सिद्धार्थ-कियारा लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, असं दिसतंय. कारण कियारा नुकतीच मनिष मल्होत्रासोबत दिसून आली. त्यामुळं मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेला लेहेंगा ती लग्नात घालणार आहे, असं म्हटलं जातंय.

तर सिद्धार्थ सध्या दिल्लीत आहे. कारण त्याची फॅमिली दिल्लीत असते. तो लग्नाची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला आहे. आणि आता तो थेट तयारी करून विवाहस्थळी पोहचणार आहे, अशा चर्चा आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ-कियारा राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळं सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now