Ladki Bahin Yojana | राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी नव्या वर्षाची सुरुवात दिलासादायक ठरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. संक्रांतीच्या सणाआधी हा दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सरकारकडून डिसेंबरचा प्रलंबित हप्ता आणि जानेवारीचा नियमित हप्ता असे दोन्ही मिळून 3000 रुपये एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. (Ladki Bahin Yojana Installment)
मकरसंक्रांतीपूर्वी पैसे खात्यात जमा होणार? :
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीपूर्वी म्हणजेच मकरसंक्रांतीच्या (Makar sankranti) मुहूर्तावर ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Women Scheme Update)
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात DBT माध्यमातून थेट 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे गेल्या महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ladki Bahin Yojana | कोणत्या महिलांना मिळणार 3000 रुपयांचा लाभ? :
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhar Seeded) आहे, अशा सर्व पात्र महिलांना हा एकत्रित हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनाही आता दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारने निवडणूक प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. (Ladki Bahin Yojana Installment)
तसेच सरकारकडून महिलांना आपले बँक खाते अॅक्टिव्ह आहे का, KYC पूर्ण आहे का, याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण DBT प्रक्रियेसाठी KYC आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. मात्र KYC केल्यानंतरही लाभार्थी माहितीची पडताळणी आणि कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार असून, निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ थांबवला जाऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.






