Ladkya Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण दहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मे महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख
या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल आता माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ मे २०२५ रोजी जमा झाला होता.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याचा हप्ता मे मध्येच जमा होण्याची शक्यता आहे. आज १३ मे २०२५ असून, पुढील पंधरा दिवसांत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळू शकतो.
हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता
म्हणजेच, अकराव्या हप्त्याची रक्कम मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून या योजनेचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होत आहे. त्यामुळे या महिन्यातही त्याच वेळेत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) करतील, असा दावा केला जात आहे.
Title : Ladki Bahin Yojana: May Installment Likely by This Date






