लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 3000 रुपये; सरकारने घेतला मोठा निर्णय

On: January 12, 2026 2:47 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी तब्बल 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीपूर्वीच ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू आहेत. सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana)

दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची तयारी :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ सध्या राज्यातील सुमारे 2.23 कोटी महिलांना मिळत आहे. यामध्ये सुमारे 93 लाख महिला शहरी भागातील असून उर्वरित महिलांचा समावेश ग्रामीण भागात होतो. एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थींना दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने महिला व बालविकास विभागाकडून अर्थ मंत्रालयाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने याआधीच दर महिन्याला 10 तारखेपर्यंत लाभ वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच धोरणानुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मकरसंक्रांतीपूर्वी रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Women Scheme)

Ladki Bahin Yojana | निधी, निवडणूक आणि पुढील चित्र :

मिळालेल्या माहितीनुसार, महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे सुमारे 6,700 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्यासाठी सुमारे 6,690 कोटी रुपयांची गरज असल्याचे प्रशासनाचे अंदाज आहेत. लाभार्थी महिलांची संख्या मोठी असल्याने निधी वेळेत उपलब्ध होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार असल्याने या हप्त्याच्या वितरणाबाबत राजकीय वादही सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात पत्र लिहिले असून, आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र ही योजना आधीपासून सुरू असल्याने आणि यापूर्वीही आचारसंहितेच्या काळात लाभ वितरित करण्यात आला असल्याने यावेळीही महिलांना पैसे मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हणणे आहे.

दरम्यान एकूणच, लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, मकरसंक्रांतीपूर्वीच दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता खात्यात जमा होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

News Title : Ladki Bahin Yojana: Maharashtra Women Likely to Receive ₹3000 Before Makar Sankranti

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now