लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

On: July 21, 2025 4:35 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांच्या खात्यात दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. जुलै महिना संपायला अवघे ९ दिवस शिल्लक असताना, अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे “यंदा जुलैचा हप्ता उशिरा मिळणार का?” असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. (Ladki Bahin Yojana)

जूनचा हप्ता झाला होता उशिरा जमा :

जून महिन्यात देखील हप्ता उशिरा जमा झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळेच जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळेल का, याबाबत साशंकता आहे. सद्यस्थितीत शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र महिना संपण्यापूर्वीच हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या योजनेतून दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1500 थेट जमा केले जातात. महागाईच्या काळात ही रक्कम महिलांसाठी आर्थिक आधार ठरत असून घरखर्च, वैद्यकीय गरजा किंवा स्व-रोजगारासाठीही उपयोगी पडते.

Ladki Bahin Yojana | काय आहेत पात्रतेचे नियम :

– ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.

– सरकारी कर्मचारी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला

– ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे. (Ladki Bahin Yojana)

राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे आणि पात्र नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे.

जुलै महिना संपण्यास थोडेच दिवस उरले असतानाही अद्याप हप्त्याच्या रक्कमेबाबत ठोस अपडेट उपलब्ध नाही. मात्र सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार हप्ता लवकरच जमा होणार असल्याची शक्यता आहे. महिलांनी बँक खाते आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावेत आणि एसएमएसद्वारे क्रेडिट अलर्टवर लक्ष ठेवावं, असा सल्ला दिला जात आहे.

News Title: Ladki Bahin Yojana July Installment Update: ₹1500 May Be Credited Soon, Check Eligibility Rules

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now