लाडक्या बहिणींनो शेवटची संधी, अन्यथा पैसे मिळणार नाही!

On: November 17, 2025 1:31 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने E-KYC अनिवार्य केल्याने या योजनेचे पुढील हप्ते मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर ही E-KYC करण्याची शेवटची तारीख असल्याचे मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अजूनही E-KYC न केलेल्या लाभार्थ्यांचे 1,500 रुपयांचे पुढील हप्ते थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Ladki Bahin Yojana E-KYC Deadline)

अनेकांना एकच प्रश्न पडला आहे की E-KYC करण्यासाठी आधार कार्डावर मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे का? जर तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल, किंवा आधारशी लिंक नसेल, तर आता UIDAI ने दिलेल्या सुविधेमुळे तुम्ही सहजपणे अपडेट करू शकता. आधार अपडेटच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देखील सरकारने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मोबाईल नंबर आधारशी लिंक हवा का? E-KYC साठी आवश्यक माहिती :

लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना आधारवरील नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकता असते. कारण OTP आधारित पडताळणी यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्यांच्या आधारवर मोबाइल नंबर नाही किंवा बदलला आहे, त्यांनी अपडेट करणे गरजेचे आहे. UIDAI ने मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. (Ladki Bahin Yojana E-KYC Deadline)

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन “बुक अपॉइंटमेंट” पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर शहर, केंद्र आणि वेळ निश्चित करून आधार सेवा केंद्रात भेट देता येते. तिथे नवीन मोबाइल नंबर देऊन आधार अपडेट करता येतो. एक छोटा फॉर्म भरून व ओटीपी पडताळणी करून अपडेट प्रक्रिया पूर्ण होते.

Ladki Bahin Yojana | आधार पडताळणी अत्यावश्यक :

सरकारच्या नियमांनुसार, लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवताना आधार पडताळणी अत्यावश्यक आहे. ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि सरकारी योजनांसाठी आधारचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे E-KYC वेळेत न झाल्यास हप्ता थांबू शकतो. राज्यभरातील लाखो लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

आता फक्त एकच दिवस शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने नागरिक E-KYC केंद्रांवर गर्दी करत असल्याचे दिसत आहे. 18 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीमुळे सरकारही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सूचना देत आहे. ज्यांनी अद्याप E-KYC केलेले नाही त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मिळणारे 1,500 रुपये थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Title: Ladki Bahin Yojana E-KYC Deadline on 18 November: Is Aadhaar-Mobile Linking Mandatory?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now