‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

On: November 2, 2024 12:41 PM
Ladki Bahini Yojana
---Advertisement---

Mumbai | राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण (Ladki Bahin Yojana) योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे अडकायला नको, म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिलेत, असं शिंदे म्हणले.

आता 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका आहेत. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे याच नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. कारण आम्ही देणारे लोक आहोत. घेणारे लोक नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणांचा चांगला आशीर्वाद मिळाला तर लाडक्या बहिणांना योजनेत (Ladki Bahin Yojana) मिळाले 1500 रूपये वाढवून त्यांना देऊ. माझ्या बहिणांना मला लखपती बनवायचं आहे, असं माझं स्वप्न आहे, असंही पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही तत्पर आहोत असं सांगताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. या योजनेच्या विरोधात काँग्रेससह मविआचे लोक कोर्टात गेले. मात्र आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींना फक्त 1500 रुपयांपर्यंत नाही तर, त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहि‍णींना लखपती करू, असंही ते म्हणालेत.

कोणीही मायेचा लाल आला तरी या योजनेला बंद करु शकत नाही असं शिंदेंनी सांगितलं. लाडकी बहीण योजानेमुळे विरोधक हादरले आहेत, त्यामुळे ते म्हणतायत की योजना बंद करु आणि आम्हाला तुरूंगात टाकू, मात्र अशा विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत त्यांना घरी बसवतील, असा टोला शिंदेंनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पवार कुटुंबात फूट; 50 वर्षांत ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर

‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

UPI नियमांत 1 नोव्हेंबरपासून ‘हा’ मोठा बदल होणार!

तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा; धन-संपत्तीत होईल वाढ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now