पवार कुटुंबात फूट; 50 वर्षांत ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

On: November 2, 2024 11:27 AM
Baramati Lok Sabha
---Advertisement---

Baramati | आज दिवाळी पाडवा आहे. बारामतीची परंपरा आहे की पवार कुटुंबीय (Pawar family) मोठ्या उत्साहात दिवाळी आणि विशेष करून पाडवा साजरा करतात. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे होताना दिसत आहेत.

शरद पवार यांचा गोविंदबाग या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होत आहे, तिथे ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळी सात वाजता अजित पवार, सुनेत्रा पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसले. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते.

पवार कुटुंबात फूट

दुसरीकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झालेत. पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.

कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत- सुप्रिया सुळे

राजकीय दृष्ट्या आम्ही वेगवेगळा मार्ग स्विकारला आहे. मात्र कुटुंब (Pawar family) म्हणून आम्ही एक आहोत, असं सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबिय म्हणताना दिसले. मात्र आता पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर

‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

UPI नियमांत 1 नोव्हेंबरपासून ‘हा’ मोठा बदल होणार!

तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा; धन-संपत्तीत होईल वाढ

जब्याला मिळाली शालू!, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे अडकणार लग्नबंधनात?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now