लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

On: December 21, 2024 12:12 PM
delhi news
---Advertisement---

Ladki bahin yojana | महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ 2100 रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे. महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या या योजनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यातच त्याची रक्कम खात्यात जमा केली होती. (Ladki bahin yojana)

आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत. जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता.

त्यातच महिलांना आता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये, याबाबतही उत्सुकता आहे. महायुतीने निवडून आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, अशी घोषणा केली होती. आता महिलांना याचे पैसे कधी मिळणार, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. (Ladki bahin yojana )

मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वाची प्रतिक्रिया-

“कुणीही मनात कोणतीच शंका ठेऊ नका. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहि‍णींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेबाबत देखील महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याच्या प्रक्रियेसाठी काही दिवस लागू शकतात. आता महिलांना संक्रांतीला डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, लाडक्या बहीणींची संक्रांत गोड होईल. (Ladki bahin yojana )

त्यापूर्वी सरकारकडून योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाऊ शकते.यामध्ये ज्या महिला अपात्र आढळतील, त्यांचे अर्ज रद्द केले जातील. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

News Title –  Ladki bahin yojana 2100 Rs installment

महत्त्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं; ‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, किती रुपयांनी घसरले भाव?

तुम्ही रॉयल्टी चोरी करता, तोंड काळ का केलं? भाजपच्या ‘या’ नेत्याचा खडसेंना सवाल

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

बीडचं राजकारण तापणार?, शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर

Join WhatsApp Group

Join Now