कृणाल पांड्या झाला दुसऱ्यांदा बाबा, पोस्ट करत दिली माहिती

On: April 27, 2024 12:49 PM
Krunal Pandya Baby Boy
---Advertisement---

Krunal Pandya Baby Boy | आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या आहेत. अशातच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. कृणालची पत्नी पंखुडीने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. यामुळे आता पांड्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 21 एप्रिलला कृणाल (Krunal Pandya Baby Boy) बाबा झाला. मात्र त्याने आज सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आपण दुसऱ्यांदा बाबा झाल्याचं सरप्राईज दिलं. (Krunal Pandya Baby Boy)

कृणाल झाला दुसऱ्यांचा बाबा, बाळाचं नावंही ठेवलं

कृणालच्या पोस्टवर अनेकजण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कृणाल आणि पंखुडीने आपल्या बाळाचे नाव देखील निश्चित केलं आहे. त्या दोघांनी आपल्या बाळाचं नाव हे वायु ठेवलं. 2017 मध्ये कृणाल आणि पंखुडीने विवाह केला होता. तर 2022 मध्ये त्यांनी पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्याचे नाव हे कवीर असं ठेवण्यात आलं होतं.

सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

सध्या कृणाल पांड्या हा आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो आपल्या संघासाठी झटताना दिसतो. मात्र आपल्या पुत्र प्राप्तीनंतर ब्रेक घेऊन आपली पत्नी आणि आपल्या बाळाला पाहायला गेला होता. त्याने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्याला आजी माजी खेळडूंनीही शुभेच्छा दिल्यात. (Krunal Pandya Baby Boy)


कृणाल पांड्याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स, कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एवढंच नाहीतर लखनऊ जायंट्स संघाने देखील कृणालाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिनेश कार्तिक, शिखर धवनने कृणालला शुभेच्छा दिल्या. (Krunal Pandya Baby Boy)

यंदाच्या आयपीएल हंगामात कृणालनं चांगली कामगिरी केली. गोलंदाजी करत असताना त्याने अधिकाधिक धावा रोखण्याचा प्रयत्न केला. तर आठ सामन्यात पाच गडी बाद केलेत. त्याने अधिक विकेट्स जरी नसतील घेतल्या तरीही त्याने धावा रोखण्याचं अप्रतिम काम केलंय. दरम्यान फिनिशींगचीही भूमिका घेतली.

आयपीएलच्या 121 सामन्यात 1572 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 75 विकेट्स घेतल्या आहेत.

News Title – Krunal Pandya Baby Boy Good News Update

महत्त्वाच्या बातम्या

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक

सचिन आणि सु्प्रिया पिळगांवकर यांची मुलगी खरंच दत्तक आहे का?, श्रियाने स्वतःच सत्य सांगितल्यानं मोठी चर्चा

Join WhatsApp Group

Join Now