‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक

On: February 21, 2024 5:05 PM
Kotak Mutual Fund
---Advertisement---

Kotak Mutual Fund | शिक्षण असो किंवा आरोग्य असो कोणत्या घटकासाठी कधी आर्थिक गरज समोर येईल, काही सांगता येत नाही. बऱ्याचदा आपल्याला अचानकच मोठ्या रक्कमेची गरज पडत असते. अशावेळी बँकेतून कर्ज घेण्यापेक्षा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एसआयपी (Kotak Mutual Fund) फंड.

मात्र, दीर्घकाळ टिकेल आणि मोठा परतावा देईल अशी एसआयपी निवडणेही फार कठीण जाते. कोणती एसआयपी आपल्याला अधिक नफा मिळवून देईल, याबाबत बऱ्याचदा संभ्रम निर्माण होतो. आता तुमच्यासाठी अशाच एका एसआयपीबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करताना अधिक विचार करावा लागणार नाही.

नुकताच कोटक म्युच्युअल फंडाच्या ब्लूचिप फंडाने 25 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. फंड हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही योजना 29 डिसेंबर 1998 रोजी सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीपासून आतापर्यंत त्याने 16.36% एसआयपी परतावा दिला आहे.

आर्थिक आणि जागतिक समस्यांदरम्यान परतावा

म्हणजेच गेल्या 25 वर्षांत या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक 31 जानेवारीपर्यंत वाढून सुमारे 3.50 कोटी रुपये झाली असती. अर्थातच या फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (Kotak Mutual Fund) द्वारे दरमहा 10,000 ची गुंतवणूक गेल्या 25 वर्षांत 31 जानेवारी 2024 पर्यंत अंदाजे 3.50 कोटी झाली. यावरून फंडाच्या कामगिरीचा अंदाज लावता येतो.

यामुळे ब्लूचिप शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा फंड एक उत्तम पर्याय बनला आहे. महत्वाचं म्हणजे कोटक ब्लूचिप फंडाने 2000 डॉट-कॉम बबल बर्स्ट, 2008 ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, 2016 नोटाबंदी आणि 2020 मधील कोविड-19 महामारी यांसारख्या अनेक आर्थिक आणि जागतिक समस्यांदरम्यान हे परतावे दिले आहेत.

कोटक ब्लूचिप फंड विश्वासाचे आदर्श उदाहरण

कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह म्हणाले, “गेल्या 25 वर्षांमध्ये, भारताचा लँडस्केप (Kotak Mutual Fund) लक्षणीयरीत्या विकसित झाला आहे. प्रत्येक आर्थिक चक्र, राजकीय टप्पा आणि मूलभूत बदलांमधून, कोटक ब्लूचिप फंडाने भारताच्या वाढीसाठी प्रयत्न करत एक आदर्श निर्माण केला आहे.”

मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्ष उपाध्याय हे KMAMC फंडाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी भारतातील ब्लू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फंडाच्या कामगिरीचे मार्गदर्शन करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

News Title- Kotak Mutual Fund Scheme 

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा

अजित पवार गटाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

Join WhatsApp Group

Join Now