के एल राहुल-अथियाचा लग्नसोहळा जल्लोषात झालाय सुरू

On: January 21, 2023 6:38 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय क्रिकेटर के एल राहुल(KL Rahul) आणि बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळं हे दोघं लग्न कधी करतील याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. शनिवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून त्यांच्या विवाहपूर्वीच्या कार्यक्रमांना जल्लोषात सुरूवात झाली आहे. ते दोघं २३ जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहेत.

या तीन दिवसीय लग्नसोहळ्यात काॅकटेल पार्टी, मेहंदी, हळदीसह अनेक वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी संध्याकाळी काॅकटेल पार्टी होणार आहे. तर रविवारी हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे.

या लग्नाला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मोजकाच मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. परंतु काही क्रिकेटर, काही राजकीय नेते आणि काही उद्योजकही या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

दरम्यान, हे लग्न सुनिल शेट्टीच्या खंडाळा बंगल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. लग्नानंतर मुंबई आणि बंगळूरमध्ये दोन मोठे रिसेप्शनही होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now