“उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान”

On: March 11, 2023 2:04 PM
---Advertisement---

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मला तोतऱ्या म्हणतात. पण या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे एकोणीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणालेत.

मी उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज करतोय, ज्या शिव्या द्यायच्या आहे त्या द्या पण एकोणीस बंगले कुठे गायब केले ते सांगा ना? असा सवाल किरीट सोमय्या (Kirit somayya) यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्यांचा उच्चार किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामध्ये भडवा, xतिया, भxवा, पोपटलाल असं म्हंटलं आहे. त्यावरून त्यांची संस्कृती दिसते, असं सोमय्या म्हणालेत.

याशिवाय किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. कारखान्याच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप यापूर्वीच केला होता, त्याचाच संदर्भ देऊन किरीट सोमय्या हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now