Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

On: January 6, 2024 10:10 AM
Stadium
---Advertisement---

Stadium । भारतात क्रिकेटची लोकप्रियता काय आहे हे सांगण्याची गरज नाही… भारतात शहरापासून खेड्यापर्यंत तरूणाईचे सर्वाधिक प्रेम क्रिकेटवर असते. सध्या भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम सुरू झाला असून रणजी ट्रॉफीची स्पर्धा पार पडत आहे. बरेच खेळाडू या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकिट मिळवतात. ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या स्पर्धेवर लक्ष ठेवून असते आणि खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करते.

मात्र, भारतातील एका स्टेडियमची दुरावस्था पाहून बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. परंतु, नुकतेच रणजी ट्रॉफीतील एका स्टेडियमच्या दुर्दशेचे असे चित्र समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

Stadium ची दुरावस्था

हे पाहून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल की जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे रणजी ट्रॉफीचा सामना ज्या मैदानावर होत आहे ते उच्च दर्जाचे आणि स्वच्छ आहे याची खात्री करण्यासाठी पुरेसा पैसा नाही का? होय, कारण या मैदानावर चक्क अंडरवेअरचा खजिना आणि घाणीचे साम्राज्य पाहायला मिळाले.

Stadium ची BCCI दखल घेणार?

खरं तर आपण बिहारची राजधानी पाटणा येथे मुंबई आणि बिहार यांच्यात खेळल्या जाणार्‍या रणजी ट्रॉफी सामन्याबद्दल भाष्य करत आहोत. बिहार आणि मुंबई यांच्यातील सामना होत असलेल्या स्टेडियमवर घाणीचे साम्राज्य आहे. पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मात्र या स्टेडियमच्या दुरवस्थेची अशी चित्रे समोर आली आहेत की, ती पाहून सर्वांनाच धक्का बसेल. त्यामुळे या स्टेडियमची BCCI दखल घेणार का हे पाहण्याजोगे असेल.

दरम्यान, या मैदानातील दुरावस्थेचा पुरावा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेडियमची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसते. स्टेडियममधील प्रेक्षकांसाठीच्या पायऱ्या आणि स्टॅण्ड अतिशय अस्वच्छ आहेत. ते इतके अस्वच्छ आहेत की त्यांच्यावर झुडपे उगवली आहेत. तसेच स्टँडवर माती देखील साचली आहे. याठिकाणी वर्षानुवर्षे साफसफाई झाली नसल्याचे दिसते.

Stadium वर घाणीचे साम्राज्य

तसेच स्टँडवर एक पाईप आहे जिथे कोणीतरी कपडे सुकवायला ठेवले आहेत. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे तो म्हणतोय की इथे कोणी सामना पाहायला आले तर कुठे बसायचे. व्हिडिओमध्ये काही खेळाडू मैदानावर सराव करताना दिसत आहेत. याशिवाय स्टँडवर अंडरवेअरसह काही कपडे सुकवायला ठेवले आहेत.

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा

Health Updates l रिकाम्या पोटी चहा पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; नक्की वाचा

Ram Mandir | २२ तारखेलाच बाळाचा जन्म व्हायला हवा; गर्भवती महिलांची मागणी

Rohit Sharma च्या युवा शिलेदारानं झळकावलं द्विशतक!

Join WhatsApp Group

Join Now