जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला-जावायाला जीवे मारण्याची धमकी; आव्हाडांची भावूक पोस्ट

On: February 17, 2023 12:12 PM
---Advertisement---

मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) नेते जितेंद्र आव्हाड(Jetendra Awhad) यांच्या मुलीला आणि जावायला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

आता या प्रकरणी जीतेंद्र आव्हाडांनी फेसबूकवर भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्या नताशाला मी तिच्या जन्मानंतर साध बोटही लावलं नाही किंवा ओरडलो नाही. तिच्याबद्दल जेव्हा एक व्यक्ती फिल्डींग लावून मारून टाकेन हे बोलतो, तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते.

तुम्हीच सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं की एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. या सगळ्यात भूमिका काय घ्यायची?, घाबरून घरी बसायचं?, का उघडपणे मैदानात यायचं, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

कोण आहे बाबाजी? बाबजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

त्याच्या हस्तकांकरवी जावायाचा आणि मुलीचा मर्डर होणार, हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटत असेल. राजकारण बाजूला ठेवा पण कधीतरी याचा देखील विचार करा, असंही भावूक होऊन जितेंद्र आव्हाड पोस्टद्वारे म्हटले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now