महाराष्ट्रात ‘या’ आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; धक्कादायक आकडेवारी समोर

On: March 13, 2025 9:13 AM
Kidney Health Tips
---Advertisement---

Kidney Disease | महाराष्ट्रामध्ये मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका अधिक असतो. आधुनिक जीवनशैलीमुळे हे विकार वाढत आहेत. या आजारांना प्रतिबंध कसा घालता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic Kidney Disease) म्हणजे काय?

क्रॉनिक किडनी डिसीजला किडनी फेल्युअर (Kidney Failure) असेही म्हणतात. यामध्ये मूत्रपिंड पूर्णतः निकामी होते आणि रक्तशुद्धी योग्य पद्धतीने होत नाही. विषारी घटक शरीरात वाढतात. रुग्णाला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रक्तातील सीरम क्रिएटिनीनची पातळी वाढते. त्यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे रुग्णाला डायलिसिस (Dialysis) आणि किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला जातो.

सर्वसाधारण लक्षणे आणि उपाय

क्रॉनिक किडनी डिसीजची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे लघवीतून रक्त येणे, वजन कमी होणे, चेहऱ्यावर, पायावर सूज येणे, थकवा, निद्रानाश, डोकेदुखी आणि त्वचेला खाज येणे. यावर वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंड निकामी होऊ शकते.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दरवर्षी क्रॉनिक किडनी विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 2022-23 मध्ये 6521, 2023-24 मध्ये 6839 तर 2024-25 (डिसेंबरपर्यंत) 7758 रुग्ण आढळले. (Kidney Disease)

बॉम्बे हॉस्पिटलचे (Bombay Hospital) मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्चू (Dr. Shrirang Bichu) यांच्या मते, “दरवर्षी दोन लाख नवीन रुग्णांची नोंद होते. मिठाचे अतिरिक्त सेवन हे किडनीच्या आरोग्यासाठी घातक आहे. आधुनिक जीवनशैलीचा त्याग करून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.”

Title : Kidney Disease Patients Rise in Maharashtra

 

Join WhatsApp Group

Join Now