प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बॉलिवूडवर शोककळा!

On: February 16, 2024 4:54 PM
Kavita chaudhary passed
---Advertisement---

Kavita Chaudhary Passed Away | 80 च्या दशकातील अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary Passed Away) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. यासोबत त्यांना कर्गरोगानं ग्रासलं होतं. उडान आणि आयपीएस डायरी या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी आयपीएस कल्याणी सिंहची भूमिका केली होती. 15 जानेवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेत त्या हे जग सोडून गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

कविता चौधरी यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तिचे नातेवाई, चाहते आणि मित्र मैत्रीणींनी शोक व्यक्त केला आहे. काल 15 फेब्रुवारीला निधन झालं असून आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती कविता चौधरीच्या पुतण्याने दिली होती. त्यांनी कविता चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावर अमित भेल आणि अनघ देसाई यांनी आठवणींना उजाळा दिला.

चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान

अमित भेल यांनी कविता चौधरींच्या आठवणींना उजाळा दिला. कविता या माझ्यासोबत नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये वरिष्ठ होत्या आणि आम्ही एकत्र प्रशिक्षण घेतलं होतं. आम्ही दोनवेळा मुंबईमध्ये देखील आलो होतो. दरम्यान त्याचं काल निधन झालं आणि तेव्हा त्या अमृतसर येथे होत्या. त्या एक उत्तम अभिनेत्री आणि निर्मात्या म्हणून देखील नावारूपाला आल्या. यामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

अनघ देसाई म्हणाले, “अनुपम, मी, सतिश, कविता आम्ही एकत्र नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये होतो. आम्ही अनेक वर्ष एकत्र होतो. त्यांच्याबाबतीत काही खास आठवणी आहेत. आम्ही मुंबईमध्येही अनेकदा भेटलो होतो. आम्हाला भेटून आता केवळ दोन वर्षे झाली आहेत. मात्र इतक्यात अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या पुतण्याने दिली आहे”.

 सर्फच्या जाहिरातीतून प्रसिद्धी झोतात

त्यांनी फार वर्षे काम नाही केलं. मात्र त्यांनी मनोरंजनसृष्टीत रहायला हवं होतं. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. तसेच 1980 मध्ये सर्फच्याच्या जाहिरातीमध्ये त्यांनी काम केलं आहे. यामुळे त्या जाहिरातीमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

कविता चौधरी या कांचन चोधरी भट्टाचार्य यांच्या बहिण होत्या. आयपीएल डायरीज आणि युअर ऑनर असे काही टेलिव्हीजन शो देखील त्यांनी बनवले होते.

News Title – Kavita Chaudhary Passed Away Due to heart Attack

महत्वाच्या बातम्या

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने पोस्ट करत दिली मोठी गुड न्यूज!

डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून मिळालं मोठं गिफ्ट!

गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

‘या’ 3 राशींवर आज लक्ष्मी होईल प्रसन्न!

Join WhatsApp Group

Join Now