राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्र्यांनी केली राजीनाम्याची घोषणा; ‘हा’ नेता होणार नवा मुख्यमंत्री

On: May 28, 2026 2:02 PM
Karnataka Politics
---Advertisement---

Karnataka Politics | कर्नाटक (Karnataka) मधील काँग्रेस (Congress) सरकारमध्ये मोठा राजकीय बदल घडणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या (Siddaramaiah) यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivkumar) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात नव्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजीनाम्यानंतर सत्ताबदलाची तयारी :

मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे लोकभवनमध्ये राज्यपालांच्या खासगी सचिवांकडे आपला राजीनामा सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

राजीनाम्याची घोषणा करताना सिद्धारामय्या यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत मागील तीन वर्षांत सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याची माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सिद्धारामय्या यांना पद सोडण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Karnataka Politics | डीके शिवकुमार यांची ताकद वाढणार? :

सध्या डीके शिवकुमार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे जलसंपदा, बंगळुरू शहर विकास प्राधिकरण आणि नगररचना विभागाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर ते कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. नव्या सरकारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली चार उपमुख्यमंत्री असू शकतात, अशा चर्चाही सुरू आहेत. राज्यात नवीन मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजय मिळवत डीके शिवकुमार यांनी स्वतःची मजबूत राजकीय ओळख निर्माण केली आहे. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असून महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat) आणि कर्नाटकमध्ये पक्षासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2017 मधील राज्यसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

News title : Karnataka Leadership Change Confirmed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now