BS Yediyurappa | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.
एका 17 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी येडियुरप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर येडियुरप्पांच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल
येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा,2012 पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयपीसी कलम ३५४ (अ) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचाराची ही कथित घटना 2 फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. या मुलीवर काही जणांनी अत्याचार केला होता.
17 वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नसल्याने ही महिला आणि मुलगी बीएस येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी मदतीच्या नावाखाली मुलीचे लैंगिक शोषण केले असा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाकडून आता भाजपाला टार्गेट केलं जात आहे. यामुळे आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
News Title- Karnataka Former Cm BS Yediyurappa Booked Under Pocso Act
महत्त्वाच्या बातम्या –
व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज
“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली
मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया
“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”
“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका






