Karishma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात बाॅलिवूडवर अधिराज्य गाजवलं. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांनी तिच्या चित्रपटाला पसंती दिली. एकीकडे करिश्माने तिच्या कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे गाठले, तर दुसरीकडे तिचं वैयक्तिक आयुष्यही तितक्याच अडचणींनी भरलेलं होतं. करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) 2003 मध्ये दिल्लीतील व्यापारी संजय कपूरसोबत लग्न केलं. मात्र त्यांच्यामध्ये होत असलेल्या मतभेदांमुळे त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. संजय कूपर याच्यासोबत लग्न होण्याआधी करिश्माचा साखरपुडा अभिषेक बच्चन याच्यासोबत झाला होता.
नेमकं काय आहे प्रकरण?
करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा 2002 साली पार पडला होता. आपल्या करियरमध्ये करिश्मा खूप पुढे गेली होती आणि यशस्वी देखील होती. मात्र अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करण्यात, खंबीरपणे पाय रोवण्यात व्यस्त होता. एवढंच नव्हे तर समोर आलेल्या माहितीनूसार बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थितीही त्यावेळी फारशी चांगली नव्हती.
View this post on Instagram
अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडला-
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसा वेळेस पत्नी जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला बच्चन कुटुंबाची होणारी सून असं जाहीरपणे म्हटलं होतं. एवढंच नाही तर अनेकजणांची अशी इच्छा होती की, करिश्मा कपूर बच्चन कुटुंबाची सून बनेल पण अचानक अभिषेक करिश्माचा साखरपुडा तुटल्याचं समोर आल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
अभिषेक आणि करिश्माच्या ब्रेकअपची आलेली बातमी ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यांची एंगेजमेंट कशी तुटली असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानंतर 2003 साली करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केलं.
अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाला 17 वर्ष-
पुढे 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं. 20 एप्रिल 2024ला दोघांच्या लग्नाला 17 वर्षपूर्ण झाली. काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं म्हटलं जात होतं. एवढंच नाही तर या दोघांचा घटस्फोट देखील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
News Title : Karishma Kapoor & Abhishek Bachchan’s Relation
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट
अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?
रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला
अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक






