“बॉलिवूडमध्ये एजिझम आणि सेक्सिझम अस्तित्वात…”, करीनाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!

On: March 22, 2025 6:51 PM
kareena kapoor
---Advertisement---

Kareena Kapoor | बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) नेहमीच आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिनाला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी, लग्नानंतरच्या कामाच्या पसंती आणि वयाच्या चाळिशीनंतर मिळणाऱ्या भूमिकांबाबत चर्चा करताना बॉलिवूडमधील एजिझम (Ageism) आणि सेक्सिझम (Sexism) अद्यापही अस्तित्वात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

तर तुम्हाला काम मिळेल-

करीना कपूर (Kareena Kapoor) हिने यावर उत्तर देताना स्पष्ट सांगितले की, अशा गोष्टी फक्त सोशल मीडियावरच असतात, प्रत्यक्षात नाही. ती म्हणाली, “ही चर्चा करण्यासाठी एक चांगला विषय आहे. लोक यावर लेख लिहितात, डिबेट करतात.” ती म्हणाली की अजूनही अनेक अभिनेत्री काम करत आहेत आणि त्यांना संधी मिळत आहे. “जर तुमच्यात टॅलेंट आहे, चांगलं दिसताय, आणि स्वतःवर विश्वास आहे, तर तुम्हाला काम मिळेल,” असे ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली की, वय फक्त एक आकडा आहे आणि प्रत्येक वयोगटातले लोक चांगली कामगिरी करत आहेत. करीना हिने उदाहरण देताना सांगितले की ती लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्या दुसऱ्या मुलासाठी पाच महिन्यांची गरोदर होती. तिने सांगितले की आलिया भट्ट (Alia Bhatt) सुद्धा गरोदर असतानाही काम करत आहे. त्यामुळे आव्हान स्वीकारून तो साखळदंड तोडायला हवा, असे करीना हिने ठामपणे सांगितले.

‘कॅन्सल कल्चर’वर बेबोचा विश्वास-

दरम्यान, सोशल मीडियावर चित्रपटांवर टीका होत असून ट्विटरवर ‘बॉयकॉट’ ट्रेंड सुरू आहे. यावर बोलताना करीना म्हणाली, आज अनेक प्लॅटफॉर्मवरून लोकांना आपली मते मांडण्याची मोकळीक आहे. पण प्रत्येक वेळी सर्व काही गांभीर्याने घेणं गरजेचं नसतं. “प्रत्येकाला मत आहे, पण काही गोष्टी दुर्लक्षित करायला शिकलं पाहिजे,” असं ती म्हणाली.

तिने स्पष्ट केलं की जर चित्रपट चांगला असेल, तर प्रेक्षक नक्कीच पाहायला जातील. “सामाजिक माध्यमांवरील टीका मागे टाकण्यासाठी चित्रपट उत्कृष्ट असायला हवा,” असं ती म्हणाली.

मी पक्ष्यासारखी आहे, उडून जाते-

एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला की चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती त्या भावनेत गुंतून राहते का? यावर ती हसत म्हणाली, “मी पक्ष्यासारखी आहे, उडून जाते.” ती म्हणाली की दररोजचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येक दिवस ‘वाव’ नसतो. मात्र तिने हे शिकून घेतले आहे की, प्रत्येक गोष्टीवर मात करून आयुष्यात पुढे जायचं असतं.

News Title : Kareena Kapoor talks about Ageism and sexism

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now