माता सीतेशी स्वतःची तुलना, अभिनेत्री करीना कपूरवर संतापले नेटकरी

On: October 8, 2024 12:32 PM
kareena kapoor compare herself with mata sita
---Advertisement---

Kareena Kapoor | अभिनेत्री करीना कपूर खान ही आपल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करीनाने स्वतःची तुलना माता सीतासोबत केली. यामुळे अभिनेत्री आता ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी करीनाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सध्या फक्त आणि फक्त करीना कपूरची चर्चा रंगली आहे. (Kareena Kapoor)

सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री माता सीता यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे.‘माता सीता यांच्या शिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही, त्याच प्रमाणे करीना कपूर शिवाय रोहित शेट्टी याचा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही…’, असं करीना म्हणाली आहे. तिचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

करीना कपूरचा व्हिडिओ तूफान व्हायरल

‘कमाल उदाहरण आहे, आजपर्यंत हे ऐकलं नाही…’, असं एक नेटकरी व्हायरल व्हिडिओवर कमेन्ट करत म्हणाला. तर ‘ही काय वायफळ बडबड करत आहे…’, असं दूसरा नेटकरी म्हणाला. ‘स्वतःची तुलना देवासोबत करत आहे…’, असं अन्य एक नेटकरी म्हणाला. त्यामुळे सध्या करीनाचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. करीनावर नेटकरी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. (Kareena Kapoor)

दरम्यान, करीना कपूरच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

करीना दिसणार ‘सिंघम अगेन’ सिनेमात

‘सिंघम अगेन’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अजय देवगण ‘बाजीराव सिंघम’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग ‘संग्राम भालेराव’ (सिम्बा) च्या भूमिकेत तर अक्षय कुमार ‘वीर सूर्यवंशी’च्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यात अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘लेडी सिंघम एसपी शक्ती शेट्टी’च्या भूमिकेत आहे. (Kareena Kapoor)

बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ला ‘भूल भुलैया-3’ टक्कर देणार आहे. ‘सिंघम अगेन’ हा ‘सिंघम रिटर्न्स’चा सीक्वल असणार आहे. हा सिनेमा 1 नोव्हेंबररोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी सिंघम हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. तर, सिंघम रिटर्न्स हा सिनेमा 2014 मध्ये आला होता. आता ‘सिंघम अगेन’ दिवाळीला रिलीज होणार आहे.

News Title –  kareena kapoor compare herself with mata sita

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण?’ अंकिता वालावलकरने सांगितला लग्नाचा प्लॅन

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!

गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Join WhatsApp Group

Join Now