‘माझ्या मुलीला डॉक्टरांच्या हातात देताना….’; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबाबत करण सिंह ग्रोवरचा मोठा खुलासा

On: February 6, 2024 4:59 PM
---Advertisement---

Karan Singh Grover | अभिनेत्री बिपाशा बासुने सध्या चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला आहे. लग्नानंतर तिने आपल्या कुटुंबाला अधिक महत्व देण्याचे ठरवलं. मात्र तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोवर अजूनही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. नुकताच त्याने ‘फायटर’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलं.

या चित्रपटानिमित्त एका मुलाखतीमध्ये करण सिंह ग्रोवरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. त्यांच्या अत्यंत कठीण काळाचा अनुभव यावेळी करणने शेअर केला. त्यामुळे सध्या याची चांगलीच चर्चा होत आहे. आपली मुलगी ‘देवी’ बाबत करणने हा खुलासा केला.

“…तेव्हा माझे हातपाय सुन्न पडले होते”

करण आणि बिपाशा यांना 2022 मध्ये कन्यारत्न झाले. आपल्या लाडक्या लेकीचं नाव त्यांनी ‘देवी’ ठेवलं. मागच्या वर्षी बिपाशाने मुलीच्या आरोग्याबाबत मोठा खुलासा केला होता. आता तीचा पती करणने (Karan Singh Grover) देवीवर करण्यात आलेल्या ओपन हार्ट सर्जरीबद्दलचे अनुभव सांगितलं आहे.

देवीच्या हृदयात जन्मापासूनच दोन छिद्र असल्याने तिच्यावर सर्जरी करण्यात आली. याच काळात करणला ‘फायटर’ची शूटिंगही करायची होती. या गंभीर परिस्थितीमध्ये मला सतत वाटायचे की, मी कामावर जाऊच नये. माझ्यासाठी मुलीला सोडून जाणं खूप कठीण होतं. पण, बिपाशामुळे मला त्यातून सावरण्याचं बळ मिळालं. बिपाशाने सर्व परिस्थिती हाताळली, असा खुलासा करणने केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

सर्जरीसाठी देवीला डॉक्टरांकडे सोपवायचं होतं, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मी तिला डॉक्टरांच्या हातात देऊच शकत नव्हतो. माझे हातपाय सुन्न झाले होते. तो क्षण आयुष्यातील अत्यंत कठीण क्षण होता. त्यावेळी मला अशी परिस्थिती पाहण्यापेक्षा माझा मृत्यू सोपा वाटत होता, असे भावुक होत करण म्हणाला.

“बिपाशा अत्यंत धाडसी महिला आहे”

माझी पत्नी बिपाशा खूप निडर आहे. तिने खूप धाडसाने या परिस्थितीचा सामना केला. ती एक आई आहे आणि एका आईसाठी हा क्षण अत्यंत कठीण असतो. मात्र, तिने खूप धीर धरून त्याचा सामना केला. तिच्यामुळे मी हे सर्व सांभाळू शकलो. ती प्रचंड शक्तीशाली महिला आहे, असं कौतुकही करणने (Karan Singh Grover) पत्नी बिपाशाचं केलं.

News Title-  Karan Singh Grover big revelation about his daughter health

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

“मिर्झापुर सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल”

लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

Join WhatsApp Group

Join Now