कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

On: March 25, 2024 12:26 AM
Kangana Ranaut
---Advertisement---

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत अनेक राज्यांतील १११ उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. याशिवाय हिमाचलच्या कांगडा लोकसभा मतदारसंघातून डॉ.राजीव भारद्वाज यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याच्या एक दिवस आधी कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बगलामुखी मंदिरात देवीचा आशीर्वाद घेतला होता. यावेळी पत्रकारांनी तिला लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले की, ती निवडणूक लढवणार का, तेव्हा कंगनाने सांगितले होते की, आईने आशीर्वाद दिल्यास ती मंडी लोकसभा मतदारसंघातून नक्कीच निवडणूक लढवेल. कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक मोठा मेसेज लिहून आनंद व्यक्त केला आहे.

या पोस्टनंतर कंगना रणौतचे चाहते तिचे सोशल मीडियावर अभिनंदन करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले- इथे पोहोचल्याबद्दल कंगनचे अभिनंदन. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं- अभिनंदन, आम्ही हिमाचलमध्ये तुमच्यासाठी प्रचार करण्यासाठी वाट पाहत आहोत.

अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या वाढदिवसाला बगलामुखी मंदिरात दर्शन घेतले होते. हे मंदिर बगलामुखी देवीला समर्पित आहे. कंगनाने मंदिरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली की, जर आई खूश असेल तर मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे.

भाजपने सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांना पीलीभीतमधून तिकीट मिळाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधींच्या जागी त्यांना पिलीभीतमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने आतापर्यंत 291 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसह इतर राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!

संभाजीराजेंची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाले ‘राजघराण्याची झूल न पांघरता’

बच्चू कडूंची अमरावतीत मोठी खेळी; मुख्यमंत्र्यांनी फोन करत थेट भेटायलाच बोलवलं

अशा मुलांपासून 4 हात लांब राहतात मुली; होकार देण्याआधी 100 वेळा विचार करतात

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now