Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

On: January 25, 2024 6:58 AM
Kangana Ranaut
---Advertisement---

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये कंगनाने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगनाचे या भूमिकेवरून सर्वत्र कौतुक होत असताना आता अभिनेत्रीने आगामी चित्रपटातील (Emergency New Poster) तिची एक झलक शेअर केली आहे. कंगना मागील काही दिवसांपासून रामललाच्या अभिषेक सोहळ्यात व्यग्र होती. (Kangana Ranaut shares Emergency Look) पण आता ती कामावर परतली असून तिने सोशल मीडियावर तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे.

Emergency हा चित्रपट कधी चाहत्यांच्या भेटीला येणार (kangana ranaut emergency movie) याबद्दल उत्सुकता आहे. कंगना रनौतने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही फोटो शेअर करताना कंगनाने चाहत्यांना फरक सांगण्याचे आवाहन केले आहे.

Emergency चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला

दरम्यान, ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. यामधील कंगनाचा लूक सर्वांना भुरळ घालणारा आहे, ज्यामध्ये ती हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसत आहे. कंगनाने इंस्टा स्टोरीवर काही रिअल आणि काही रील फोटो शेअर करून चाहत्यांना प्रश्न विचारले आहेत.

कंगनाने इमर्जन्सी या चित्रपटाची 14 जून ही नवीन रिलीज डेट शेअर केली आहे. चित्रपटातील आपला लूक शेअर करताना तिने म्हटले की, भारताच्या वाईट, भयानक तासांमागील सत्य जाणून घ्या. 14 जून 2024 ही इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची नवीन तारीख जाहीर करत आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चित्रपटगृहातील आगमनाने इतिहास जिवंत होईल. खरं तर कंगना रनौत हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

Kangana Ranaut अन् इंदिरा गांधी

अभिनेत्री कंगना रनौत इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसली. कंगनाने इंदिरा गांधींसारखे दिसण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. इमर्जन्सी या चित्रपटात कंगना मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत असून तिनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.

कंगना व्यतिरिक्त श्रेयश तळपदे, भूमिका चावला, अनुपम खेर आणि विशाक नायर हे कलाकार ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कंगना रनौतने घेतली. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 1975 मध्ये भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. यावर आधारित इमर्जन्सी चित्रपट आहे.

News Title- Kangana Ranaut shares Emergency Look and fans say she looks exactly like former Prime Minister Indira Gandhi
महत्त्वाच्या बातम्या –

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता

IND vs ENG | विराटच्या जागी युवा खेळाडूला संधी; रहाणे-पुजारा यांना पुन्हा एकदा वगळलं

मुख्यमंत्री Eknath Shinde शेतीत रमले; हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग, पाहा फोटो

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का, गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचे मोठे आदेश

Join WhatsApp Group

Join Now