कंगनाने सुभाषचंद्र बोस यांना म्हटलं देशाचे प्रथम पंतप्रधान; सोशल मीडियावर झाली ट्रोल

On: April 6, 2024 3:23 PM
Kangana Ranaut Says Subhas Chandra Bose Was Indias First Prime Minister
---Advertisement---

Kangana Ranaut | बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत चित्रपटानंतर आता राजकारणात नशीब आजमावणार आहे. कंगनाला भाजपाकडून तिकीट देण्यात आलंय. ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतेय. तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

अशातच कंगनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.एका मुलाखतीमध्ये कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीसुद्धा कंगना आणि भाजपाची खिल्ली उडवली आहे.

कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कंगना (Kangana Ranaut) म्हणते, “आधी मला ही गोष्ट स्पष्ट करा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा जे भारताचे पहिले पंतप्रधान होते सुभाषचंद्र बोस, ते कुठे गेले?” हे ऐकल्यानंतर निवेदिका कंगनाला सांगते की सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान नव्हते.

मुलाखतीमधील ही क्लिप आता सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी आणि विरोधक विविध प्रतिक्रिया देत आहेत. कंगनाच्या या वक्तव्यावर अभिनेते प्रकाश राज यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. ‘सुप्रीम जोकर पार्टीची जोकर.. किती अपमान आहे.’, असं प्रकाश राज म्हणाले आहेत.

कंगनावर नेटकऱ्यांचा निशाणा

कंगनाला (Kangana Ranaut) आता नेटकरीदेखील ट्रोल करत आहेत. कंगना कोणत्या शाळेतून शिकली, असा सवाल काहींनी केला. तर असं ज्ञान असलेले लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला. बऱ्याच जणांची तर कंगनाची तुलना अभिनेत्री आलिया भट्टशीही केली आहे.

आलिया भट्टनेही मागे असंच काहीतरी विधान केलं होतं. त्यामुळे कंगनाची तुलना आलियाशी केली जातेय. ‘आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी टीव्हीवर असंच काहीतरी म्हटलं होतं. पण ही तर जवळपास 40 वर्षांची असून अशी चूक करतेय’, असं एका युजनरे म्हटलंय. त्यामुळे सध्या कंगनाची जोरदार चर्चा रंगत आहे.

News Title- Kangana Ranaut Says Subhas Chandra Bose Was Indias First Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या –

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटलांचं एक पाऊल पुढे; केली ‘ही’ मोठी घोषणा

Join WhatsApp Group

Join Now