चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

On: March 28, 2024 8:32 PM
Kangana Ranaut
---Advertisement---

Kangana Ranaut | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) राजकारणामध्ये एंट्री केली आहे. तिला आता हिमाचल प्रदेश येथील मंडीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत राजकारणातील एंट्रीबाबत भाष्य केलं आहे.

‘टाईम्स नाऊ समिट’शी बोलत असताना कंगनाला राजकारणात एंट्री का केली?. चित्रपट चालत नसल्यानं एंट्री केली आहे का?, असा सवाल केला. त्यावेळी कंगनानं बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचे उदाहरण देत उत्तर दिलं आहे. शाहरूख खानने 2023 मध्ये ‘डंकी’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे तीन चित्रपट देण्याआधी अनेक चित्रपट फ्लॉप गेले होते, असं कंगना (Kangana Ranaut) म्हणाली.

शाहरूख खानचं उदाहरण देत दिलं उत्तर

‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये बोलत असताना कंगना म्हणाली की “या जगामध्ये असा कोणीही अभिनेता नाही की त्याचे चित्रपट फ्लॉप गेले नाहीत. शाहरूखलाही मागील दहा वर्षांमध्ये याचा सामना करावा लागला. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले. मात्र त्यानंतर 2023 ‘पठाण’ चित्रपटाने कमाल केली. त्याचप्रमाणे माझे आठ वर्षे सिनेमे चालत नव्हते मात्र क्वीन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर पुन्हा तीन ते चार वर्षे माझे चित्रपट चालले नाहीत,” असं कंगना (Kangana Ranaut) म्हणाली.

बॉक्स ऑफिसवर आगामी कंगनाचा इमर्जन्सी नावाचा सिनेमा येत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याची चर्चा आहे. हा सिनेमा चांगली कमाई करू शकेल अशी अपेक्षा आहे, असं कंगना (Kangana Ranaut) म्हणाली आहे. हा सिनेमा दिवंगत माजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकाळातील आणीबाणीवर अधारीत आहे. येत्या 14 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. यावेळी बोलत असताना कंगनाने ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत सांगितलं आहे. “ओटीटीचा जमाना असल्यानं स्टार होणं इतकं सोप राहिलं नाही”, असं कंगना म्हणाली आहे.

कंगनाचं ओटीटीवर भाष्य

“ओटीटीमुळे कलाकारांना संधी मिळत आहे. पण ओटीटीमुळे कोणताही कलाकार स्टार झालेला दिसत नाही. आमची स्टार्सची शेवटची पिढी आहे. आम्ही प्रसिद्ध आहोत आणि देवाच्या कृपेने कामं मिळत आहेत. त्यामुळे मी फ्लॉप चित्रपटांमुळे राजकारणात आले असं नाही. कलेच्या क्षेत्रामध्ये न राहता वास्तविक राहता जगाशी गुंतवूण घ्यायचं आहे,” असं कंगना म्हणाली आहे.

News Title – Kangana Ranaut React Being Joined Politics Falling Acting Career

महत्त्वाच्या बातम्या

गोविंदाची राजकारणात एंट्री! ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

अदिती राव हैदरीने गुपचूप उरकलं लग्न?; ‘या’ अभिनेत्याशी थाटला संसार?

‘बाळासाहेबांना उसन्या भाटांची गरज पडली नाही’; अंबादास दानवे कडाडले

मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

अजित पवारांची लायकी काढणारे शिवतारे अचानक बॅकफूटवर; पवार-शिवतारेंचं मनोमिलन

 

Join WhatsApp Group

Join Now