तुझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? कंगनाचं उत्तर अन् पिकला एकच हशा

On: February 11, 2024 7:53 AM
Kangana Ranaut
---Advertisement---

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसाठी गेले काही चित्रपट चांगले राहिले नाहीत. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कंगनाच्या चित्रपटांना चांगली कमाई करता आली नाही. एकूणच कंगनाचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर आता कंगना रनौतसाठी पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचे दिसते. कंगना रनौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यश मिळवेल अशी देखील चर्चा आहे.

राजकीय विषयांवर मोकळेपणाने बोलणारी स्पष्टवक्ता अभिनेत्री कंगना रनौतला एका कार्यक्रमात विचारण्यात आले की, तिची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? यावर तिने एक भन्नाट उत्तर दिले. कंगना रनौत आगामी ‘Razakar: Silent Genocide Of Hyderabad’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती.

कंगनाची मिश्किल टिप्पणी

ट्रेलर लॉन्चच्या इव्हेंटमध्ये कंगनाला विचारण्यात आले की तिची देशाची पंतप्रधान होण्याची काही योजना आहे का? यावर ‘इमर्जन्सी’ फेम अभिनेत्रीने मिश्किलपणे उत्तर दिले की, मी नुकताच ‘इमर्जन्सी’ नावाचा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला पंतप्रधान म्हणून कोणीही पाहू इच्छित नाही. तिच्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अलीकडेच कंगनाने ती राजकारणात जाणार नसल्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने सोशल मीडियावर एका चाहत्याला उत्तर देताना सांगितले होते की, मी राजकीय व्यक्ती नाही. मला राजकारणात येण्यासाठी अनेकदा विचारणा केली गेली. पण मी त्या क्षेत्रात गेले नाही. तसेच मी राजकारणात प्रवेश करायचा की नाही हे लोकांनी ठरवावे, असेही तिने म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

Kangana Ranaut ‘इमर्जन्सी’मध्ये झळकणार

कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याचेही बोलले जाते. अलीकडेच हिमाचल प्रदेशातील भाजप अध्यक्षांनी याचे संकेत दिले होते.

दरम्यान, कंगना तिच्या विधानांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. ती सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना पाहायला मिळते. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देखील तिने उपस्थिती दर्शवली होती.

News Title- Do you want to be Prime Minister Bollywood actress Kangana Ranaut has responded to this question
महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग

‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल

Join WhatsApp Group

Join Now