कंगनाची पठाणच्या वादात उडी! बाॅलिवूडवाल्यांना दिला कठोर शब्दांत गंभीर इशारा

On: January 28, 2023 1:15 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत येत असते. आताही तसंच काहीसं घडलं आहे. कंगनानं पठाणच्या वादात उडी टाकत थेट बाॅलिवूडवाल्यांनाच धमकी दिली आहे.

शाहरूख खानचा(Shah Rukh Khan) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. परंतु तरीही हा चित्रपट पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. काही बाॅलिवूड कलाकारांनीही ‘द्वेषावरचा विजय’ म्हणत पठाण चित्रपटाच्या यशाचे कौतुक केले आहे.

परंतु कंगनानं असं म्हणणाऱ्या बाॅलिवूडवाल्यांना थेट धमकीच दिल्यानं कंगना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या संदर्भात कंगनानं एक ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये कंगनानं लिहिलं आहे की, बाॅलिवूडवाल्यांनो, या देशात सुरू असलेल्या हिंदूंच्या द्वेषामुळं तुम्ही त्रस्त आहात, असं दाखवू नका. जर मी पुन्हा ‘द्वेषावर विजय’ हे शब्द ऐकले तर मी जसा आधी तुमच्या क्लास घेत होते तसा पुन्हा सुरू करेन.

तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि चांगले काम करा आणि राजकारणापासून दूर रहा, अशी धमकीच कंगनानं बाॅलिवूडवाल्यांना दिली आहे. आता यावर बाॅलिवूड परिवारातील कोणी काय उत्तर देईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now