‘हे दुःख मी एकटी सहन करू शकत नाही’, अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का

On: March 21, 2024 1:11 PM
Kangana Ranaut Breaks Down After Sadhguru Undergoes Brain Surgery
---Advertisement---

Kangana Ranaut | प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशन कोईम्बतूरचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. 17 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून या ऑपरेशननंतर त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ देखील बनवला आणि शेअर केला आहे.

सदगुरुंच्या सर्जरीविषयी कळताच सोशल मिडियावर त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. अभिनेत्री कंगणा रनौतनेही त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. तिने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित सदगुरुंच्या प्रकृतीविषयी कळताच आपल्या भावना व्यक्त केल्या.

कंगणा रनौतची पोस्ट

आज जेव्हा मी सदगुरुंना आयसीयूच्या बेडवर पाहिलं तेव्हा मला त्यांच्या अस्तित्वाच्या नश्वर स्वभावाची अचानक जाणीव झाली. ते आपल्यासारखंच हाडं, रक्त, मांसाचे बनले आहेत, हे याआधी कधीच माझ्या मनात आलं नव्हतं. जणू काही देवच कोसळला, ही पृथ्वी हलली आणि आकाशाने मला एकटं सोडलं असं वाटलं होतं.

माझं डोकं गरगरू लागत होतं. वास्तव परिस्थितीची जाणीव मला होत नव्हती आणि मला त्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नव्हता. मी अचानक रडू लागले. आज लाखो लोक (भक्त) माझ्यासारखेच दु:खी असतील. मला माझं दु:ख तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं आहे, मी ते एकटं सहन करू शकत नाही. ते लवकरच बरे व्हावेत. अन्यथा सूर्य उगवणार नाही आणि पृथ्वीही हलणार नाही. हा क्षण निर्जीव आणि स्थिर आहे, अशी पोस्ट कंगणा रनौतने (Kangana Ranaut) केली आहे.

सदगुरू यांची ब्रेन सर्जरी करण्यात आली

दरम्यान, ओपरेशननंतर सदगुरुंच्या टीमकडून त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसून येत आहे. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. तरीही ते महाराशिवरात्रीच्या मोठ्या कार्यक्रमांसह इतरही विविध आयोजित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करत होते.

मात्र, 15 मार्च रोजी त्यांचा एमआरआय स्कॅन केला असता त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर 17 मार्च रोजी त्यांच्यावर तातडीने सर्जरी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे.

News Title-  Kangana Ranaut Breaks Down After Sadhguru Undergoes Brain Surgery 

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले

Join WhatsApp Group

Join Now