Kangana Ranaut | ‘ड्रामा क्वीन’ नेमकं कुणाला डेट करतेय?, अयोध्येतील फोटोमुळे चर्चांना उधाण

On: January 24, 2024 5:51 PM
Kangana Ranaut and Nishant Pitti photos
---Advertisement---

Kangana Ranaut | अभिनेती कंगना रनौत (Kangana Ranaut ) ही तीच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यासोबतच बऱ्याचदा ती चालू घडामोडींवरही प्रतिक्रिया देत असते. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वी कंगना मुंबईत एका विदेशी मिस्ट्री बॉयसोबत दिसून आली होती. त्यामुळे कंगना त्याला डेट करत असल्याचं म्हटलं गेलं.

कंगनाने मात्र नुकतीच अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. अयोध्येत ती ‘इज माय ट्रीप’च्या फाउंडर सोबत दिसून आल्याने आता वेगळ्याच चर्चा रंगत आहेत. त्यामुळे कंगना नेमकं कुणाला डेट करतेय याबाबत चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

कंगनाचे अयोध्येतील फोटो व्हायरल

प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात कंगना (Kangana Ranaut) आणि ‘इज माय ट्रीप’चे फाउंडर निशांत पेट्टी एकत्र दिसून आले. या दोघांनी एकत्र बरेच फोटोदेखील काढले. त्यांचे फोटो सोशल मिडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. यानंतर नेटकरी कंगना आणि निशांत पेट्टी यांच्या अफेअरबद्दल बोलत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये कंगना पेस्टल ग्रीन कलरचा सूट आणि त्यावर शाल घेतल्याची दिसून येत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिने सुंदर साडी घातली आहे, ज्यामध्ये कंगना अतिशय सुंदर दिसते आहे.

कंगना आणि निशांत पेट्टी यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर होणाऱ्या चर्चेवर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने मिडियाला चुकीची माहिती पसरावू नका, असा आग्रह केला आहे. तसेच, ती निशांत पेट्टीला नाही तर दुसऱ्याला डेट करत असून वेळ आल्यावर याबाबत खुलासा करणार असल्याचंही कंगनाने सांगितलं आहे. त्यामुळे कंगनाच्या आयुष्यात सध्या तरी तो मिस्ट्री बॉय असल्याचंच स्पष्ट झालं आहे.

कंगना नेमकं कुणाला डेट करतेय?

काही दिवसांपुर्वी कंगना (Kangana Ranaut ) आणि एक विदेशी मुलगा सलूनमधून बाहेर पडताना दिसून आले. कंगनाने सुंदर स्काय ब्लू कलरचा स्कर्ट तसेच गाॅगल घातला होता. तिच्यासोबत असणाऱ्या मुलाचा तीने घट्ट हाथ पकडला होता. दोघेही यावेळी खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही यावेळी कपल्स वाइब्स दिल्या. त्यामुळे चाहत्यांकडून वेगवेगळे अंदाज बांधले गेले.

कंगना आणि या मिस्ट्री बॉयला पापाराझी यांनीही लगेच कॅमेऱ्यात टिपले. पापाराझी यांना पाहून कंगना लाजताना दिसली. तिच्या लाजण्यामुळे तर त्यांच्या नात्याच्या चर्चा आणखीनच रंगल्यात. चाहते या मिस्ट्री बॉयबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. मात्र, कंगनाने याबाबत अद्याप कोणताच खुलासा केला नाही.

News Title – Kangana Ranaut and Nishant Pitti photo viral

 महत्त्वाच्या बातम्या –

Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?

Ramlalla Jewellery | सोन्या-चांदीची खेळणी ते हीरे-मोत्यांचा शृंगार; रामलल्लाच्या दागिन्यांची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Shoaib Malik | “…मग सानियाशी निकाह का केला?”; शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर शाहरूख खानचा व्हिडीओ व्हायरल

“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

Join WhatsApp Group

Join Now