बीफ बद्दलचं कंगनाचं जुनं ट्विट व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल, आता म्हणाली ‘कट्टर हिंदू…’

On: April 8, 2024 7:56 PM
Kangana Ranaut Breaks Down After Sadhguru Undergoes Brain Surgery
---Advertisement---

Kangana Ranaut | राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येतेय तशा देशाच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण होतोय. विरोधक सत्ताधाऱ्यांवर तर सत्ताधारी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कंगना रणौतवर (Kangana Ranaut) टीका केली. कंगना रणौतला बीफ खायला आवडतं आणि भाजपने तिला तिकीट दिलं, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावर आता कंगना रणौतनं (Kangana Ranaut) पलटवार केला.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा कंगनाने (Kangana Ranaut) आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला. कंगनाच्या सोशल मीडियाच्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Kangana Ranaut)

कंगना रणौतची पोस्ट चर्चेत

कंगना राणौतनं बीफ आणि रेड मी खात नाही. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून योगिक आणि आयुर्वेदिक पद्धतीचा प्रचार करत आहे. अशा युक्त्या माझी प्रतिमा डागाळण्यासाठी काम करणार नाही.


मी कशी आहे सर्वांना माहिती आहे. मी कट्टर हिंदू आहे. कोणी माझ्या लोकांशी दिशाभूल करू शकत नाही…जय श्रीराम असं कंगना म्हणाली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अशातच कंगनाचा जुनी पोस्ट एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कंगनाचीच चर्चा

नेटकऱ्याने सोशल मीडियावर कंगनाच्या पोस्टवर एक पोस्ट कमेंट केली. कंगनाने यापूर्वी बीफ खाणं किंवा अन्य प्रकारचं मांस खाल्याने काहीही होत नाही. ही धर्माची गोष्ट नाही असं एका नेटकऱ्यांने पोस्ट केली. सध्या जिकडे तिकडे कंगनाचीच चर्चा आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौतला लोकसभेचं भाजपनं तिकीट दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान फार लांब राहिलं नसून आता लवकरच मंडी मतदरासंघातील मतदार कंगनाला निवडून देणार का? हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Kangana Ranaut Aggressive On Beef Controversy

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार

“सुप्रिया सुळे माझा दादा माझा दादा म्हणायच्या तेव्हा खूप राग यायचा”

अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट

Join WhatsApp Group

Join Now