कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत 11 ते 31 ऑगस्टदरम्यान मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: August 12, 2025 12:00 PM
Samruddhi Highway
---Advertisement---

Kalyan-Shilphata Traffic Changes | एमएमआरडीएच्या मेट्रो 12 (कल्याण-तळोजा) प्रकल्पाअंतर्गत सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे कल्याण-शिळफाटा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे बदल 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत रात्री 11:45 ते पहाटे 5:00 या वेळेत लागू असतील. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दोन टप्प्यांमध्ये हे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan-Shilphata Traffic Changes)

पहिला टप्पा: 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2025 :

प्रवेश बंद:

कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौकातून प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग:

या वाहनांना मानपाडा चौकातून सर्व्हिस रोडने पुढे जाऊन सोनारपाडा चौकातून पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे लागेल.

Kalyan-Shilphata Traffic Changes | दुसरा टप्पा: 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 :

प्रवेश बंद 1:

कल्याण शिळरोडवरून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सुयोग रीजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग:

ही वाहने पीलर 110 वरून उजवीकडे वळून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरून पीलर 128 समोर डावीकडे वळून पुढे जातील.

प्रवेश बंद 2:

कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना डी.एन.एस. चौकात प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग:

ही वाहने डी.एन.एस. चौक पीलर 144 वरून सर्व्हिस रोडने जाऊन सुयोग हॉटेल अनंतम चौकातून पुन्हा कल्याण रोडवर इच्छित स्थळी जाऊ शकतील. (Kalyan-Shilphata Traffic Changes)

हे बदल फक्त रात्रीच्या वेळेत लागू असतील, त्यामुळे नागरिकांना दिवसा फारशी गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा या नियमातून वगळण्यात आल्या आहेत.

News Title: Kalyan-Shilphata Traffic Changes from Aug 11 to 31: Road Closures and Alternate Routes Due to Metro 12 Work

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now