कल्याणमध्ये खळबळजनक प्रकार! रुग्णालयात मराठी तरुणीला बेदम मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

On: July 22, 2025 4:05 PM
Kalyan Girl Assault
---Advertisement---

Receptionist Attack | कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात मराठी तरुणीवर झालेली बेदम मारहाणीची घटना समोर आली आहे. ही तरुणी रिसेप्शनिस्ट (Receptionist Attack) म्हणून काम करत होती, आणि तिने डॉक्टरांची मिटिंग सुरु असल्याचे सांगताच एका संतप्त तरुणाने तिच्यावर थेट हल्ला चढवला. हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या आरोपीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या मिटिंगचा राग, थेट लाथेने मारहाण :

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव झा नावाच्या तरुणाने रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांकडे त्वरित भेट मागितली होती. मात्र रिसेप्शनिस्ट तरुणीने डॉक्टर सध्या मिटिंगमध्ये आहेत, थोडा वेळ थांबा असे सांगताच आरोपीचा राग अनावर झाला. त्याने सरळ तिला लाथा मारत खाली पाडले आणि तिला जबर मारहाण केली. परिसरातील लोकांनी हस्तक्षेप करत प्रकार शांत केला.

ही संपूर्ण घटना २१ जुलैच्या सायंकाळी “श्री बाल चिकित्सालय” या रुग्णालयात घडली. सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसते की, तरुणाने प्रथम तरुणीला ढकलले, नंतर तोंडावर लाथ मारत तिला जमिनीवर फेकले आणि त्यानंतरही तिच्यावर लाथा-बुक्क्यांचा भयंकर मारा केला. हा प्रकार पाहून डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Kalyan Receptionist Attack)

Receptionist Attack | आरोपी नशेत होता, पोलीस तपास सुरू :

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नशेत होता आणि जबरदस्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने नियमांचे पालन करत त्याला अडवले, आणि त्यामुळेच तिला मारहाण सहन करावी लागली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात केले आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. रुग्णालयातील कर्मचारी केवळ आपले कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणे अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणात परप्रांतीय आरोपी गौरव झा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

News Title: Kalyan Hospital Horror: Marathi Woman Brutally Attacked by Man, Caught on CCTV

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now