गोरी कशीकाय झाली?, अखेर काजोलनं सांगूनच टाकलं रहस्य

On: February 10, 2023 5:01 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री काजोल(Kajol) ही बाॅलिवूडमधील(Bollywood) एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है यांसारखे अनेक तिचे चित्रपट सुपरहिट ठरले.

नव्वदच्या दशकात तर काजोलची तरूणांमध्ये मोठी क्रेझ होती. त्यावेळी शाहरूख आणि काजोलच्या जोडीनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. काजोलची ही क्रेझ चाहत्यांमध्ये अद्याप कायम आहे.

सुरूवातीला काजोलचा अनेक चित्रपटांमध्ये रंग काहीसा सावळा दिसत होता. परंतु आता पाहिलं तर काजोल एकदम गोरीपान दिसते. त्यामुळं अनेकजण तिला प्रश्न करत असतात की काजोल तू एवढी गोरी कशीकाय झालीस?

नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत तिनं या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. काजोलच्या स्टोरीत तिचा एक फोटो होता आणि या फोटोमध्ये दिसत होतं की तिनं पूर्ण चेहऱ्याला काळ्या रंगाचा मास्क घातला आहे, म्हणजेच पूर्ण चेहरा झाकून घेतला आहे. तसेच तिनं सनग्लाससुद्धा लावला आहे.

काजोलनं या फोटोला कॅप्शन दिलं होतं की, जे मला विचारतात की मी इतकी गोरी कशी झाले त्यांच्यासाठी हे. अर्थातच तिला सांगायचंय की मी उन्हामध्ये स्किनची काळजी घेते. तिनं हसण्याचे इमोजीसुद्धा टाकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now