मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Nationlist Congress Paraty) फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सातत्याने ऐकमेकांर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आमदार जितेंद्र अव्हाड (Jitendra Avhad) यांच्यावर ठाण्याच्या एका पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी फुटली, अशा शब्दात टीका केली होती. त्या टिकेला जितेंद्र अव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र अव्हाडांंनी एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. शरद पवारांना (Sharad Pawar) मी समजावू शकतो, परंतू ते माझे ऐकतात हे केवळ अक्कल नसलेल्या माणसांनाच वाटू शकतं. शरद पवार हे कुणाचंच ऐकत नाहीत, हे ज्याला अक्कल आहे, त्यांना माहिती आहे, अशा शब्दात जितेंद्र अव्हाडांनी अजित पवारांचा समाचार घेतला.
शरद पवार कुणाचंच ऐकत नाहित. सगळ्यांचं ऐकून घेऊन, स्वतः निर्णय घेणारे ऐकमेव नेते शरद पवार आहेत. ते माझे कसे काय ऐकू शकतात?, असा सवाल जितेंद्र अव्हाडांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या विधानाचं मला आश्चर्य वाटलं. त्यांनी मला मोठे करुन टाकलं. काही वेळा अशी टीका विनोदी टीका म्हणून घ्यावी लागते. त्यांनी शरद पवार साहेबांनंतर थेट माझ्यावरच टीका केली. याचा मला आनंद आहे. मी ठाण्याचाच पठ्ठ्या आहे. त्यांनी टिका केली म्हणून, स्वतःला का कमी लेखायचं?, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार गटानं मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या सोबतच जितेंद्र अव्हाड यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढवला होता. ठाण्याच्या पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज
लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा
“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”






