वडिलांसाठी लेक मैदानात! जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने फडणवीसांना सुनावले, शेअर केला ‘तो’ स्क्रीनशॉट.

On: July 18, 2025 10:26 AM
Jitendra Awhad Daughter
---Advertisement---

Jitendra Awhad Daughter | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “जसा राजा तशी प्रजा! सगळे गुंडे” अशा शब्दात तिने भाजप समर्थकांवर टीका करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत विचारले – “तुम्ही फक्त मजा पाहत राहा?”

नताशा आव्हाडने सोशल मीडियावर एक अश्लील पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, त्यात तिच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीच्या आणि अमर्यादित भाषेचा वापर करण्यात आला आहे. ती म्हणते, “माझी या वादात कुठलीही भूमिका नाही, तरीही मला यात ओढलं जातंय. हे अत्यंत नीच कृत्य आहे.” (Jitendra Awhad Daughter Natasha post)

सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट; नताशा आक्रमक :

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असल्याचे लिहिलेल्या एका X युजरने नताशा आव्हाड यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये “ज्याच्या पोरीने मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला, तो आता मंगळसूत्राच्या नावाने गावभर बोंबलतो,” असे अपमानकारक वाक्य लिहिले आहे. त्याखाली “बेटी*** *** कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा” अशा प्रकारचे जघन्य शब्द वापरले गेले.

या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत नताशाने थेट फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केले असून, या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने म्हटले, “@Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही फक्त मजा पाहत राहा का?” (Jitendra Awhad Daughter)

Jitendra Awhad Daughter | पडळकर-आव्हाड वादाची पार्श्वभूमी :

गेल्या काही दिवसांत विधानभवनात आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात वाद चिघळलेला आहे. मागील आठवड्यात आव्हाड यांनी विधानभवनात पडळकरांना उद्देशून “मंगळसूत्र चोर” अशी टिप्पणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर यांनी आव्हाडांना शिवीगाळ करत विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच धारेवर धरले.

या वादामुळे दोन्ही नेत्यांचे समर्थक विधानभवन परिसरात भिडले. अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडण्याचे प्रकार घडले. या सर्व घटनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राजकारणाची पत खाली गेल्याची टीका सर्वत्र होत आहे.

News Title: Jitendra Awhad’s Daughter Natasha Slams Devendra Fadnavis Over Abusive Social Media Post

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now