“या माणसाने देशाचं वाटोळं केलं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”

On: October 5, 2023 2:02 PM
---Advertisement---

मुंबई | अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं केंद्रात सरकार (Centra Goverment) असताना मोठं जन आंदोलन उभारलं होतं. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), किरण बेदी, कुमार विश्वास आदी नेत्यांना घेऊन अण्णा हजारे यांनी जोरदार आंदोलन केलं होतं.

अण्णांच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. अण्णांनी आधी उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी देशभरात जनजागृती करून भ्रष्टाचारा विरोधात रान उठवलं होतं. मात्र केंद्रात मोदी सरकार (Modi Goverment) आल्यानंतर अण्णांनी गेल्या 9 वर्षात एकही आंदोलन केलं नाही. यामुळे सध्या विरोधक अण्णांना धारेवर धरताना दिसतात.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशी टीका आव्हाडांनी अण्णा हजारेंवर केली आहे.

देशातील भ्रष्टाराचारावर अण्णा हजारे यांनी सोयीस्कर मौन पाळलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी अण्णांवर टीका करणारं ट्विट केल्याची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now