Recharge Plans l भारतातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या, जिओ आणि एअरटेल यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्समुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे, कारण आता त्यांना डेटासाठी महागडे प्लॅन घेण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हे प्लॅन्स दीर्घकाळ चालणारे आणि अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहेत.
स्वस्त प्लॅन, जास्त फायदे:
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Telecom Regulatory Authority of India) अर्थात ट्राय (TRAI) च्या नवीन नियमांमुळे कंपन्यांना ग्राहकांना परवडणारे प्लॅन्स देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेलने हे नवे प्लॅन्स आणले आहेत. विशेष म्हणजे या प्लॅन्समध्ये डेटा नसला तरी इतर सुविधा भरपूर आहेत.
Recharge Plans l जिओचा धमाकेदार प्लॅन:
जिओने 336 दिवसांच्या वैधतेसह एक स्वस्त प्लॅन आणला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited calling) आणि 3600 एसएमएस (SMS) मोफत आहेत.
जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ टीव्ही (Jio TV) आणि जिओ क्लाऊडचे (Jio Cloud) सब्सक्रिप्शनही फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मनोरंजनाचे आणि आवश्यक सुविधांचे फायदे एकाच प्लॅनमध्ये मिळणार आहेत.
एअरटेलचा फायदेशीर प्लॅन:
एअरटेलने 1849 रुपयांचा 336 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आणला आहे. यातही अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 एसएमएस मोफत आहेत. यासोबतच फ्री हॅलो ट्यूनची (Free hello tune) सुविधाही आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएससोबत वैयक्तिकृत हॅलो ट्यूनचा आनंद घेता येणार आहे.






