“आपल्याला बदला घ्यायचाय, पवारसाहेब तुम्ही फक्त कुणाच्या डोक्यावर हात ठेऊ नका”

On: October 27, 2023 8:32 PM
---Advertisement---

श्रीवर्धन | शेकापचे नेते जंयत पाटील (Jayant Patil) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. तसेच आपल्याला बदला घ्यायचाय, पवारसाहेब तुम्ही फक्त कुणाच्या डोक्यावर हात ठेऊ नका, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी पवारांना आवाहन केलं आहे.

आजच्या कार्यक्रमाला भावी खासदार अनंत गीते उपस्थित आहेत. मागच्या वेळी आमच्या काही चुका झाल्या. यावेळी आम्ही त्या चुका टाळू, असं जयंत पाटील म्हणाले.

आज मुस्ताक अंतुले यांना बोलवलं कारण आमच्या सोबत अंतुले साहेब आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे. हा बालेकिल्ला अंतुले यांचा आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढाया केल्या. त्यासाठी आम्ही शरद पवार यांच्या शिव्या खाल्ल्या. आता हा बालेकिल्ला कुणाचा आहे हे बोलणार नाही पण इंडिया आघाडीच्या बैठकीत नक्की बोलेन, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now