जयंत पाटलांचा मोठा दावा, अजित पवार टेंशनमध्ये?

On: October 6, 2023 10:07 AM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) टेंशनमध्ये येण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही लहान मुलांना जरी विचारलं. तरी ती मुलं सांगतात की शरद पवार यांचंच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. या सरकारचा फक्त सहा महिन्याचा खेळ उरला आहे, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत.

महाराष्ट्रात लोकांनी ठरवलय भाजपला हटवायचं. पक्ष तोडून आमच्या लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्यावर आरोप केला. आमच्यातले काही लोक तोडून त्यांच्यासोबत नेले. पण जनता आमच्यासोबत आहे. शरद पवारांच्या बाजूने महाराष्ट्रातील 80 % लोकांनी अॅफिडेव्हिट दिलं आहे. 24 राज्यात आमचं संघटन आहे. पक्ष आमचा आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

देशात महागाई, बेरीजगारीसारखे मुद्दे आहेत. याकडे सरकारचं लक्ष नाही. मणिपूर हिंसाचारावर हे बोलत नाहीत. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष्य करुन मोठ्या पक्षांना तोडण्याचं काम सध्या केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now