Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

On: January 17, 2024 12:13 PM
Jaya Bachchan
---Advertisement---

Jaya Bachchan l बॉलीवूडचा वीरू म्हणजेच धर्मेंद्र त्याच्या हिंदी चित्रपटांमधील कामासाठी चांगलाच ओळखला जातो. बॉलीवूडचा “ही-मॅन” म्हणून ओळखला जाणाऱ्या धर्मेंद्र यानी त्याच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये (Jaya Bachchan) अभिनय केला आहे. मात्र असा एक काळ होता तेव्हा धर्मेंद्र नेहमीच त्याच्या खाजगी लाईफमध्ये देखील चांगलाच चर्चेत असायचा. धर्मेंद्रच्या अभिनयासोबतच (Dharmendra) महिला त्याला देखील पसंती देत असतं.

अशातच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलियासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील भूमिकेत दिसले होते. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांच्याशी संबंधित एक जुनी घटना (dharmendra) चाहत्यांना शेअर केली होती.

Jaya Bachchan l जया बच्चन धर्मेंद्रवर फिदा :

धर्मेंद्रने चाहत्यांना असा एक प्रसंग सांगितलं की धर्मेंद्रचे चाहते देखील देखील चकित झाले होते. गुड्डी या चित्रपटात जया बच्चन आणि धर्मेंद्र यांनी (Jaya Bachchan) एकत्र काम केले होते, याच चित्रपटादरम्यान एक घटना घडली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन थोडीसी लाजाळू होती. मात्र तरीसुद्धा धर्मेंद्रसोबत काम करण्यासाठी जया बच्चन खूप उत्सुक होती.

अशा परिस्थितीत जेव्हा धर्मेंद्र चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर आले तेव्हा जया सोफ्याच्या मागे लपून त्यांना पाहत असे. तसेच जयाजींचे माझ्याबद्दलचे प्रेम आणि आदर देखील होता. जया आणि अमिताभ यांना मी खूप दिवसांपासून ओळखतो. शोलेच्या शूटिंगदरम्यान आम्ही बराच वेळ एकत्र घालवला आहे, अशा शब्दांत धर्मेंद्रने (Dharmendra) जुन्या गोष्टींना एकप्रकारे उजाळा दिला आहे.

Jaya Bachchan l जया यांनी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दिली प्रेमाची कबुली :

याशिवाय जुन्या काळात जया बच्चन (Jaya Bachchan) आणि धर्मेंद्र नेहमीच चर्चेत असायचे. अशातच जया बच्चन यांनी एकदा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये धर्मेंद्र आवडत (Dharmendra) असल्याचे कबूल केले होते. धर्मेंद्रसोबतच्या भेटीची आठवण करून देताना जया म्हणाली, ‘जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी खूप घाबरले होते आणि सोफ्याच्या मागे लपले होते.

इतक्या देखण्या माणसासमोर काय करावं तेच कळत नव्हतं. पांढर्‍या पँट आणि पांढर्‍या शर्टात तो ग्रीक देवासारखा दिसत (Jaya Bachchan) होता हे मला अजूनही आठवतं आहे. जयाजींनी ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये जुन्या गोष्टी सांगून एकप्रकारे प्रेमाची कबुलीच दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक

Raveena Tandon l कुणाचं कुणासोबत अफेअर… अभिनेत्री रविना टंडननं केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now