जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

On: February 15, 2024 7:20 PM
Jaya Bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan | बाॅलिवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांची जोडी कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असते. अमिताभ आणि जया बच्चन या दोघांनी देखील अनेक चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे. मात्र आज देखील अमिताभ बच्चन चित्रपटात सक्रिय असतात. दरम्यान बच्चन कुटुंब कायम आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच आपल्या पर्सनल लाईफबाबत चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या संपत्तीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जया अमिताभ बच्चन यांची संपत्ती समोर

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे चित्रपट आज देखील छपरफाड कमाई करत असताना दिसतात. यासोबतच ते टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ या शोसाठी सूत्रसंचालन करत असतात. त्यामुळे यामधून त्यांना भक्कळ पैसा मिळतो. तर दुसरीकडे पत्नी जया बच्चन देखील बाॅलिवूडमधील ‘राॅकी और रानी की प्रेम’ कहानी या चित्रपटात झळकल्या होत्या.

दरम्यान, या दोघांच्या संपतीचा आकडा सोमर आला आहे. बिझनेस टूडेच्या रिपोर्टनुसार, जया बच्चन यांची 2022-23 मध्ये एकूण 1.63 कोटी रुपये संपती असल्याचं समोर आलं. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची देखील संपती कमी नाहीये. याच रिपोर्टमध्येच अमिताभ बच्चन यांच्या संपतीबदल देखील सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रुपये इतकी आहे.

जया बच्चनचा बँक बॅलेन्स-

शपथपत्रात असाही खुलासा करण्यात आला आहे की जया (Amitabh Bachchan) यांचा बँक बॅलेन्स 10.11 कोटी रुपये इतका आहे. तर बिग बींकडे जवळपास 120.45 कोटी रुपये आहेत. या दोघांची संपत्ती मिळून 849.11 कोटी रुपये इतकी आहे. बिग बी आणि जया यांची स्थावर मालमत्ता 729.77 कोटींच्या घरात आहे.

गाड्या आणि दागिणे किती?

या वेळी जया बच्चन यांनी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या आणि दागिन्यांनबदल माहिती अॅफिडेविटमध्ये दिली आहे. बिग बींकडे 17 कोटी रुपयांचं कार कलेक्शन आहे. यामध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. जया यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने आहेत तर बिग बींकडे 54 कोटी रुपयांचे दागिने आहेत.

News Title : jaya amitabh bachchan networth

महत्त्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

“पापापा म्हणत पाटील पडले आता काका का म्हणत…”; काका-पुतण्यामध्ये चांगलंच वाजलं

पुणे हादरलं! लॉजवर मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

“अशोक चव्हाण यांचं अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा…”

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now