रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

On: March 20, 2024 12:04 PM
Javed Akhtar
---Advertisement---

Javed Akhtar | गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकतीच त्यांची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य की अयोग्य? यावर भाष्य केलं आहे.

रस्त्यावर नमाज पठण करणं योग्य की अयोग्य?

जावेद अख्तर (Javed Akhtar) नेहमी आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम बांधवांना पोलिसांनी तेथून हकलवलं, त्या परिस्थितीवर आता जावेद अख्तर यांनी आपलं मत मांडलं आहे. यावर जावेद अख्तर उत्तरले म्हणाले की, “नमाज पठण रस्त्यावर करणं हे चूकीचं आहे. नमाज पठण करण्यासाठी जागा नसेल तर सरकारकडून नमाज पठणासाठी जागा मागा”, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

“पोलिसांनी जो मार्ग अवलंबला होता तो देखील चुकीचा होता,” असं जावेद अख्तर म्हणाले आहेत. यामुळे आता जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

जावेद अख्तर यांचं बेधडक वक्तव्य

आतापर्यंत जावेद अख्तर यांनी अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. ज्यामध्ये समाज आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींवर जावेद अख्तर यांनी भाष्य केलं आहे. काही बेधडक वक्तव्यामुळे त्यांना वादग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.

जावेद अख्तर हे नेहमी प्रोफेशनल आयुष्यामधील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अख्तर यांचा बॉलिवूडमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जावेद अख्तर यांनी अनेक सिनेमांमध्ये गीतकार म्हणून महत्त्वाची भूमिका केली आहे.

एक मुलाखतीमध्ये त्यांनी ठमुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा अधिकार असल्याने हिंदु जळतात,ठ असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. या वक्तव्याने ते अधिक चर्चेत आले होते.

News Title – Javed Akhtar Statement On Namaj Pathan At Road

महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांचा मनोज जरांगेंना मोठा धक्का!

वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

‘तुझी खरी लायकी फक्त…’; मिटकरींनी काढली रोहित पवारांची लायकी

Join WhatsApp Group

Join Now