“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

On: February 8, 2024 10:48 AM
Jasprit Bumrah
---Advertisement---

Jasprit Bumrah | भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 9 बळी घेऊन पाहुण्या संघाचा समाचार घेतला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. बुमराहने या कसोटीच्या पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेतले होते. अशाप्रकारे जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सामन्यात 9 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला

शानदार कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी हैदराबाद कसोटीत या वेगवान गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. बुधवारी आयसीसीने आणखी एक खुशखबर देत बुमराहला आयसीसीचा नंबर वन गोलंदाज जाहीर केले. त्यानंतर बुमराहची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

बुमराहने व्यक्ती केली खदखद

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात 15 बळी घेतले आहेत. या मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. पण, आता बुमराह त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून चर्चेत आला आहे. बुमराहने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पाठिंबा देणारे आणि अभिनंदन करणारे लोक यांची तुलना करण्यात आली आहे.

दरम्यान, बुमराहने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कठीण काळातील सोबती आणि यशाचे अभिनंदन करणारी मंडळी दर्शवण्यात आली आहे. एकूणच कठीण काळात सोबत कोणी नसते मात्र यश मिळाल्यावर सर्वच लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो असे बुमराहने या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.

Jasprit Bumrah ची स्टोरी चर्चेत

जसप्रीत बुमराहची स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने हैदराबाद कसोटीत भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव केला. पण टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटीत शानदार पुनरागमन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

 

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लिश संघाचा 106 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या मालिकेतील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. बीसीसीसीआयने अद्याप उर्वरित तीन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली नाही. विराट कोहलीचे पुनरागमन होणार का हे पाहण्याजोगे असेल.

News Title- ind vs eng test series Indian fast bowler Jasprit Bumrah’s Instagram story is going viral on social media
महत्त्वाच्या बातम्या –

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई

नॉट रिचेबल किशन सापडला! टीम इंडियातून सुट्टी अन् ‘या’ 2 खेळाडूंसोबत सराव

Join WhatsApp Group

Join Now